दारूबंदीसाठी ३०७ महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच नजीकच्या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी मुक्तिपथ ...

307 women come together for drunkenness | दारूबंदीसाठी ३०७ महिला एकवटल्या

दारूबंदीसाठी ३०७ महिला एकवटल्या

ठळक मुद्देतीन गावांत क्लस्टर कार्यशाळा : दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच नजीकच्या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमूद्वारे चित्तरंजनपूर, मुरखळा माल आणि जामगिरी या गावांमध्ये क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आल्या. १६ गावातील एकूण ३०७ महिला या कार्यशाळांना उपस्थित होत्या. दारूविक्री बंद करण्यासाठी विविध उपायांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली आहे. गावात ठराव घेऊन ती प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला प्रयत्नशील आहे. ही बंदी अशीच टिकवून ठेवण्यासाठी तसेच विक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी आवश्यक विषयांवर चर्चा या कार्यशाळेत झाली. चित्तरंजनपूर येथील कार्यशाळेला किष्टापूर, दुगार्पूर, प्रियदर्शिनी, रेश्मिपूर, सगनापूर आणि अड्याळ येथील एकूण १४८ महिला उपस्थित होत्या.
मुरखळा येथील कार्यशाळेला कान्होली, चाकलपेठ, येकोडी आणि कळमगाव येथील ९१ तर जामगिरी येथे मारोडा, भोगनबोडी आणि गहुबोडी येथील गाव संघटनेच्या ६८ महिला उपस्थित होत्या.
यातील काही गावांमध्ये अद्यापही दारूविक्री सुरू असल्याने त्याचा त्रास इतर गावांना होत आहे. या गावांची दारूविक्री कशी बंद करायची, यावर क्लस्टर कार्यशाळेत चर्चा झाली. सामूहिक प्रयत्नांनी नजीकच्या गावातील विक्री कशा प्रकारे बंद केली याचे अनुभवही काही गावातील महिलांनी विशद केले. सामूहिक प्रयत्नांनी ही दारूविक्री रोखण्याचा निर्धार महिलांनी यावेळी केला. मुक्तिपथ संघटकांनी महिलांना विस्तृत मार्गदर्शन केले.
चंद्रपूरच्या दारूबंदीची अंमलबजावणी करा
चंद्रपूरच्या दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. चंद्रपुरातील दारूबंदी उठविल्यास त्याचा गडचिरोली जिल्ह्यावर आणि त्यातही चामोर्शी तालुक्यावर जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा ठराव तीनही क्लस्टर कार्यशाळेत घेऊन तशी मागणी महिलांनी केली आहे.

Web Title: 307 women come together for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.