चार तालुक्यांसाठी ३०६ नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:42 IST2017-02-07T00:42:05+5:302017-02-07T00:42:05+5:30
दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या चार तालुक्यांमधील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी सोमवार हा नामांकन सादर करण्याचा शेवटचा दिनांक होता.

चार तालुक्यांसाठी ३०६ नामांकन
वेलगूर-आलापल्ली क्षेत्रात सर्वाधिक अर्ज : राकाँ, काँग्रेस, भाजप, आविसं स्वबळावर मैदानात
गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या चार तालुक्यांमधील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी सोमवार हा नामांकन सादर करण्याचा शेवटचा दिनांक होता. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. चारही तालुक्यांमध्ये जि.प.साठी एकूण १२३ व पं.स.साठी १८३ असे एकूण ३०६ नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
अहेरी तालुक्यातील खमनचेरू-नागेपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रासाठी पाच, वेलगूर-आलापल्ली क्षेत्रासाठी २१, महागाव खुर्द-देवलमरी क्षेत्रासाठी पाच, पेरमिली-राजाराम क्षेत्रासाठी नऊ, रेपनपल्ली-उमानूर क्षेत्रासाठी सहा, जिमलगट्टा-पेठा क्षेत्रासाठी सात असे एकूण ५३ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी शेवटच्या एकाच दिवशी सुमारे ४२ नामांकन दाखल करण्यात आले. १२ पंचायत समिती गणासाठी एकूण ६२ नामांकन सादर करण्यात आले आहेत. यामध्ये खमनचेरू गणासाठी चार, नागेपल्ली चार, वेलगूर आठ, आलापल्ली चार, महागाव खुर्द चार, देवलमरी चार, पेरमिली ११, राजाराम पाच, रेपनपल्ली चार, उमानूर तीन, जिमलगट्टा सहा व पेठा गणासाठी पाच नामांकन सादर करण्यात आले आहेत. पंचायत समिती गणांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी ५२ नामांकन सादर करण्यात आले आहेत. अहेरी तालुक्यात शेवटच्या दिवशी नामांकन पत्र दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषी सभापती अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता दीपक आत्राम यांच्यासह काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज सादर केले.
सिरोंचा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी एकूण २८ नामांकन सादर करण्यात आले आहेत. झिंगानूर-आसरअल्ली क्षेत्रासाठी सात, विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद क्षेत्रासाठी सात, नारायणपूर-जानमपल्ली क्षेत्रासाठी सहा, लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा क्षेत्रासाठी आठ नामांकन सादर करण्यात आले आहेत.
पंचायत समितीच्या आठ गणांसाठी ५६ नामांकन सादर करण्यात आले आहेत. यामध्ये झिंगानूर गणासाठी सात, आसरअल्ली सहा, विठ्ठलरावपेठा सहा, जाफ्राबाद ११, नारायणपूर पाच, जानमपल्ली आठ, लक्ष्मीदेवीपेठा सात, अंकिसा गणात सहा नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
नारायणपूर-जानमपल्ली जि.प. क्षेत्रासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्लापेल्ली बानक्का मदनया, अपक्ष म्हणून मेडिपल्ली राधिका राजबापू, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाडी पल्लवी शिवय्या, भारतीय जनता पार्टीतर्फे कुमरी पुष्पलता मदनय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विठ्ठलरावपेठा-जाफराबाद जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मडावी लालूबाई मोडी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम, कुळमेथे लता व्यंकटी, बहुजन समाज पक्षाकडून दिकोंडा मंजुळा श्रीनिवास, भारतीय जनता पार्टीकडून गेडाम कमला सदाशिव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा क्षेत्रात अपक्ष म्हणून पुलगम निर्मला चंद्रशेखर, अपक्ष म्हणून कंकडालवार सोनाली अजय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे वेमुला शारदा सत्यम, भाजपातर्फे पांडवला श्रीदेवी जयराम, अपक्ष म्हणून रंगू अरविला लक्ष्मय्या यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजपातर्फे चनावार निरूपता सुनिल यांनी अर्ज दाखल केले.
झिंगानूर-आसरअल्ली क्षेत्रात भारतीय जनता पार्टीतर्फे पायम सरीता येर्राय्या, बहुजन समाज पार्टीतर्फे पिर्ला पुजा पोचम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मडावी मुल्ली जोगा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिडाम वैशाली दामोधर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन क्षेत्रांसाठी एकूण ११ नामांकन तर पंचायत समितीच्या चार गणांसाठी एकूण २० नामांकन शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत.
आरेवाडा-नेलगुंडा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाकडा रायगर भगिरथ, अपक्ष उमेदवार म्हणून तिम्मा सुधाकर लच्चू, बोगामी रामा चुकू, अॅड. नरोटी लालसू सोमा व काँग्रेसच्या वतीने सिडाम रमेश सोनू, भाजपाच्या वतीने सडमेक मनोहर लालसाय यांनी नामांकन दाखल केले आहेत.
कोठी-मन्नेराजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेतर्फे विद्यमान जि.प. सदस्य कौशी ग्यानकुमारी टांगरू, अपक्ष म्हणून पातर धु्रपता धर्मदास, काँग्रेसतर्फे आत्राम उषा राजू, अपक्ष म्हणून वडे सुजाता चिन्ना, भाजपतर्फे नरोटे रूक्मिणी चैतू यांनी नामांकन सादर केले आहे.
नेलगुंडा पंचायत समिती गण सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव आहे. या गणातून भाजपातर्फे भांडेकर दीपक पत्रू, राकाँतर्फे भांडेकर रामजी सोमा, अपक्ष म्हणून भांडेकर गंगाराम देऊ, धुर्वे प्रकाश कोतला, मडावी सुखराम महागू, बोगामी लता सुधाकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मन्नेराजाराम गणासाठी भाजपातर्फे पातर लक्ष्मण ललित, राकाँतर्फे मडावी इंदरसाई रामशहा, अपक्ष म्हणून टेकाम राकेश मदनय्या, काँग्रेसतर्फे आत्राम राजू मुरा यांनी नामांकन दाखल केले आहे.
आरेवाडा पं.स गणात राकाँतर्फे विडपी पिंकी चुकू, काँग्रेसतर्फे परसा बेबी केशव, अपक्ष म्हणून कुडयामी पे्रेमिला झुरू, कुंजामी तनुजा बाजीराव, भाजपतर्फे कुमरे निलाबाई मनोहर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कोठी गणातून राकाँतर्फे वेलादी अर्चना मदन, अपक्ष म्हणून कोडापे गोई बलदेव, काँग्रेसतर्फे पुंगाटी जनी पुसू, सडमेक निर्मला शंकर यांनी नामांकन सादर केले आहेत.
एटापल्ली तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामध्ये जारावंडी-कसनसूर जि.प. क्षेत्राकरिता ११, हालेवारा-गेदा आठ, गट्टा-पुरसलगोंदी क्षेत्राकरिता पाच, उडेरा-गुरूपल्ली क्षेत्राकरिता सात असे ३१ नामांकन अर्ज दाखल झाले. तर जारावंडी पं.स. गणात ११, हालेवारा पाच, गट्टा चार, उडेरा चार, कसनसूर पाच, गेदा चार, पुरसलगोंदी तीन, गुरूपल्ली येथे नऊ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
आज होणार उमेदवारी अर्जाची छाननी
७ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे व त्याच दिवशी वैध नामांकनांची यादी प्रकाशित केली जाईल.
नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरूध्द जिल्हा न्यायाधिशांकडे १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अपील करता येणार आहे.
१३ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार असून २३ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.