३०० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:47 IST2018-07-21T00:45:59+5:302018-07-21T00:47:15+5:30
नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली.

३०० किलो प्लास्टिक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली.
प्लास्टिक वापराचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक व इतर काही प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. ही बंदी २३ जूनपासून लागू करण्यात आली. गडचिरोली नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास २५ जूनपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी शहरातील काही दुकानांना प्लास्टिक बंदीबाबतचे नोटीस चिपकविले. त्यानंतर न.प.कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली. पालिकेच्या पथकाने गुरूवारी चामोर्शी मार्गावरील १२ ते १६ दुकानांची तपासणी केली. यापैकी काही दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक आढळून आली. संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वीही पालिकेने चार ते पाच वेळा प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पथकामध्ये नितीन गौरखेडे, नितेश सोनवाने, दिनेश धोटे, किशोर ठेमस्कर, श्यामराव खोब्रागडे, वासुदेव अंबादे, मारगोनवार, मेश्राम, वाळके, भांडेकर आदींचा समावेश आहे.