जिल्ह्यात २९ कोरोनामुक्त, तर १४ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:29+5:302021-07-03T04:23:29+5:30

जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ३०२७७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९४१० वर पोहोचली, तसेच सध्या १२७ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

29 corona free, 14 new corona free in the district | जिल्ह्यात २९ कोरोनामुक्त, तर १४ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात २९ कोरोनामुक्त, तर १४ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ३०२७७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९४१० वर पोहोचली, तसेच सध्या १२७ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.४२ टक्के, तर मृत्यू दर २.४४ टक्के झाला.

नवीन १४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १, भामरागड तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ७, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ४ जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या २९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ८, भामरागड १, चामोर्शी ८, मुलचेरा ३, सिरोंचा ६, कुरखेडा ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: 29 corona free, 14 new corona free in the district