भाविकांवर २८ कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:24 IST2019-02-28T23:24:05+5:302019-02-28T23:24:58+5:30
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली.

भाविकांवर २८ कॅमेऱ्यांची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडा : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, एसडीओ नितीन सद्गिर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, तहसीलदार अनिरूध्द कांबळे, बीडीओ एम. एन. माने, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक सवरंग शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्या, असे निर्देश दिले.
अशा राहणार विविध सुविधा
नावेने प्रवास करणाºया भाविकांना लाईफ जॅकेट पुरविले जाईल, वीज पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची सुविधा राहिल, मंदिरात व्हीआयपी रांग राहणार असून यात फक्त गर्भवती माता, वृध्द नागरिक, अपंग व्यक्ती यांना प्रवेश दिला जाईल. नदीवर सोलर फ्लॅश लावला जाईल. तो पाण्याच्या आतून सुध्दा चमकत राहिल. जिथे खोल पाणी आहे, तिथे सोलर फ्लॅश लावला जाणार आहे. अग्निशमन वाहने सुध्दा ठेवली जाणार आहेत. मोबाईल कव्हरेज राहावे, यासाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर व्हॅन बसविण्याची सूचना बीएसएनएलच्या अधिकाºयांना देण्यात आली आहे.