२८ लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: January 13, 2016 01:51 IST2016-01-13T01:51:11+5:302016-01-13T01:51:11+5:30

महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत गौण ....

28 lakhs fine | २८ लाखांचा दंड वसूल

२८ लाखांचा दंड वसूल

गडचिरोली उपविभाग अव्वल : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक
गडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीचे एकूण ४९० प्रकरणे निकाली काढून २८ लाख ६ हजार ५३० रूपयांचा दंड वसूल केला आहे. अवैधरित्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक कारवाईत गडचिरोली उपविभाग अव्वल ठरला आहे. या विभागाने वर्षभरात सर्वाधिक २०३ प्रकरणे निकाली काढून ९ लाख ५७ हजार २३० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौणखनिज आहेत. रेती, मुरूम व इतर गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतूक करण्यासंदर्भात पर्यावरण व शासनाचे नियम आहेत. याच नियमानुसार दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने रेती घाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र कमी वेळात अधिकाधिक पैसा कमविण्यासाठी अनेक रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक करतात. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक धाडसत्र राबवून कारवाई करतात.
गडचिरोली उपविभागातील धानोरा तालुक्यात महसूल विभागाने वर्षभराच्या काावधीत अवैध उत्खननाचे एकूण १९ प्रकरणे निकाली काढली. यात संबंधित तस्करांकडून १ लाख ५१ हजार ४८० रूपयांचा दंड वसूल केला. तर गडचिरोली तालुक्याच्या महसूल विभागाने वर्षभरात १८४ प्रकरणे निकाली काढून एकूण ८ लाख ५ हजार ७५० रूपयांचा दंड वसूल केला. गडचिरोली उपविभागाने वर्षभरात एकूण २०३ प्रकरणे निकाली काढून ९ लाख ५७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तालुका महसूल प्रशासनाने वर्षभरात एकूण ४० प्रकरणे निकाली काढून ३ लाख २१ हजार २०० तर मुलचेरा तालुका महसूल प्रशासनाने केवळ सहा प्रकरणे निकाली काढून २८ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी उपविभागाने ४६ प्रकरणातून एकूण ३ लाख ४९ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज तालुका प्रशासनाने ५८ प्रकरणे निकाली काढून एकूण २ लाख ७६ हजार ८२० रूपयांचा तर आरमोरी तालुका महसूल विभागाने ३८ प्रकरणे निकाली काढून एकूण १ लाख ८९ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज उपविभागाने वर्षभरात ९६ प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ६६ हजार ५२० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा तालुका महसूल विभागाने ५४ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ६८ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. कोरची तालुका महसूल विभागाने केवळ सात प्रकरणे निकाली काढून १ लाख १२ हजार ९४० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा उपविभागाने ६१ प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ८१ हजार ३४० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी तालुका महसूल विभागाने ४२ प्रकरणे निकाली काढून २ लाख ९९ हजार २०० तर सिरोंचा महसूल विभागाने २८ प्रकरणे निकाली काढून १ लाख ८५ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने ७० प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ८४ हजार ८४० रूपयांचा दंड वसूल केला.

Web Title: 28 lakhs fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.