केंद्रसंमेलनात २७ शाळा सहभागी
By Admin | Updated: December 14, 2015 01:37 IST2015-12-14T01:37:30+5:302015-12-14T01:37:30+5:30
आलापल्ली व वेलगूर केंद्रातील क्रीडा स्पर्धा जि. प. प्राथमिक शाळा बाळापूर येथे ११ डिसेंबरला पार पडल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

केंद्रसंमेलनात २७ शाळा सहभागी
तानबोडी शाळा अव्वल : केंद्रस्तरीय संमेलनाचे बक्षीस वितरण
अहेरी : आलापल्ली व वेलगूर केंद्रातील क्रीडा स्पर्धा जि. प. प्राथमिक शाळा बाळापूर येथे ११ डिसेंबरला पार पडल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य आत्माराम गद्देकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्या विजया विठ्ठलाणी, पं. स. सदस्य एस. एम दुर्योधन, शिक्षण विस्तार अधिकारी टी. एस. राऊत, प्रकाश दुर्गे, क्षेत्रसहाय्यक एस. आर. पुस्पुनूरवार, केंद्र प्रमुख मेश्राम, उपसरपंच शुभांगी झोडे, तंमुस अध्यक्ष उमेश मोहुर्ले, मुख्याध्यापिका बुरांडे, संगीता शेंडे, किशोर महाजीरे उपस्थित होते.
संमेलनात दोन्ही केंद्रातील एकूण २७ शाळांनी सहभाग नोंदविला. तानबोडी शाळेने सर्वाधिक सात बक्षीसे पटकाविली. जि. प. शाळा रामय्यापेठा, मॉडेल स्कुल आलापल्ली, जि. प. शाळा मद्दीगुडम, जि. प. शाळा आलापल्ली, बाळापूर, येंकापल्ली, वेलगूर या शाळांनी वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत यश मिळविले. यावेळी दुर्योधन यांनी मार्गदर्शन केले. संचालन केंद्र प्रमुख रमेश चांदेकर तर आभार अशोक दाहागावकर यांनी मानले. (प्रतिनिधी)