आराेग्याचे २६५ स्मार्ट कार्ड वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:33 IST2021-03-15T04:33:11+5:302021-03-15T04:33:11+5:30
पेरमिली : सिव्हिक ॲक्शन कार्यक्रमांतर्गत उपपाेलीस स्टेशन, पेरमिली येथे पाेलीस विभागाच्या पुढाकाराने दाेन दिवसीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ...

आराेग्याचे २६५ स्मार्ट कार्ड वितरित
पेरमिली : सिव्हिक ॲक्शन कार्यक्रमांतर्गत उपपाेलीस स्टेशन, पेरमिली येथे पाेलीस विभागाच्या पुढाकाराने दाेन दिवसीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत तयार करण्यात आलेले २६५ स्मार्ट कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आले.
जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे, अहेरीचे पाेलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पेरमिली उपपाेलीस ठाण्यात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान भारत याेजनेचे जिल्हा समन्वयक मनाेज उराडे, पेरमिली उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे आदी उपस्थित हाेते.
या मेळाव्याला पहिल्या दिवशी परिसरातील ५००पेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी मनाेज उराडे यांनी आयुष्यमान भारत याेजनेची संपूर्ण माहिती नागरिकांना दिली. या याेजनेचे महत्त्व पटवून दिले. या याेजनेच्या लाभासाठी काेणकाेणत्या बाबींची आवश्यकता आहे हे सविस्तर सांगितले.
आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ४५० नागरिकांनी आवश्यक दस्तावेज प्रशासनाकडे सादर केले. उर्वरित नागरिकांच्या दस्तावेजाची जमा करण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. मेळाव्याच्या शेवटी नागरिकांना अल्पाेपाहार देण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पेरमिली उपपाेलीस ठाण्याचे पाेलीस अधिकारी, सर्व अंमलदार, कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या अधिकारी व जवानांनी सहकार्य केलेे.
बाॅक्स .....
पाेलीस आपल्या दारी उपक्रमातून लाभ देणार
प्रभारी पाेलीस अधिकारी पंकज सपकाळे यांनी नागरिकांना शासनाच्या विविध याेजनांची माहिती दिली. त्या सर्व याेजनांचा ‘पाेलीस आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्नशील आहे, असे सांगितले. ग्रामस्थांना तसेच परिसरातील नागरिकांना काेणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी मुळीच संकाेच न करता पाेलिसांची मदत घ्यावी. पेरमिली परिसरात ज्या काही समस्या आहेत, त्या मूलभूत समस्या आमच्यापुढे मांडाव्या. जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या साेडविण्याचा प्रयत्न करू, असे सपकाळ यांनी सांगितले.