शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

२६ हजार वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती

By admin | Updated: April 2, 2017 01:45 IST

आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास याबाबतची माहिती

गडचिरोली मंडळातील स्थिती : वीज खंडितची मिळणार माहिती गडचिरोली : आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास याबाबतची माहिती भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे दिली जाते. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील २६ हजार ३२७ ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत. महावितरणने मोबाईल अ‍ॅप तयार केले. सदर अ‍ॅप वीज ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केला. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत राज्यातील ४८ हजार ९६७ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. अ‍ॅप बरोबरच एसएमएसद्वारे माहिती देण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. महावितरणच्या या सुविधेचा लाभ राज्यभरातील १ कोटी २१ लाख ग्राहक उचलत आहेत. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी ज्यांनी महावितरणकडे केली आहे. अशा ग्राहकांना मीटर रिडींग, वीज बिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणी अर्ज व त्याची सद्य:स्थिती मीटर वाचन घेतल्याचा व देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडीत करणे आदी बाबतच्या सूचना एसएमएसद्वारे दिल्या जात आहेत. गडचिरोली मंडळातील २६ हजार ३२७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये २२ हजार १९६ घरगुती, २ हजार १८० वाणिज्य, ३६२ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. चंद्रपूर मंडळातील सुमारे ५७ हजार १७७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे. गडचिरोली मंडळातील १ हजार ६६१ घरगुती, १५३ वाणिज्य तसेच ६० औद्योगिक ग्राहकांनी ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोली मंडळातील १ हजार ३६३ शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांकाची व २८ शेतकऱ्यांनी ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे.नोंदणी केल्यानंतर विजेबाबतची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा त्रास वाचला आहे. त्यामुळे मोबाईल नोंदणी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)