सात दिवसांत २६ पाॅझिटिव्ह; यातील अनेकांचे लसीकरण हाेते बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:35+5:302021-08-12T04:41:35+5:30
काेराेनाविरूद्धच्या लढ्यात लसीकरण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे ...

सात दिवसांत २६ पाॅझिटिव्ह; यातील अनेकांचे लसीकरण हाेते बाकी
काेराेनाविरूद्धच्या लढ्यात लसीकरण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात असले तरी काही नागरिक लसीकरणासाठी अजूनही पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक काेणतीही काळजी घेत नसल्याने भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
गडचिराेली तालुक्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह
सध्या ३४ काेराेनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १६ रूग्ण एकट्या गडचिराेली तालुक्यातील आहेत. त्यानंतर चामार्शी तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. भामरागड व कुरखेडा तालुक्यात एकही रूग्ण नाही. तर उर्वरित तालुक्यांमध्ये एक ते दाेनच रुग्ण आहेत.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
काेणत्या दिवशी किती पाॅझिटिव्ह
दिवस पाॅझिटिव्ह
बुधवार- २
गुरुवार ६
शुक्रवार ७
शनिवार ३
रविवार ०
साेमवार ५
मंगळवार ५
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण लसीकरण- ३,४५,६५७