मुरूमगाव व विष्णूपूर येथून २५ लाख रूपयांच्या दारूसह मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 02:34 IST2017-02-08T02:34:43+5:302017-02-08T02:34:43+5:30
चामोर्शी व मुरूमागाव पोलिसांनी त्यांच्या क्षेत्रात कारवाई करून सुमारे २५ लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे.

मुरूमगाव व विष्णूपूर येथून २५ लाख रूपयांच्या दारूसह मुद्देमाल जप्त
मुरूमगाव व चामोर्शी पोलिसांची कारवाई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोहफुलाची दारू काढण्याचे प्रमाण वाढले
चामोर्शी/मुरूमगाव : चामोर्शी व मुरूमागाव पोलिसांनी त्यांच्या क्षेत्रात कारवाई करून सुमारे २५ लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर मुरूमगाव पोलिसांनी दोन आरोपिंनाही अटक केली आहे.
छत्तीसगडवरून गडचिरोलीकडे दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मुरूमगाव पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार मुरूमगाव पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. दोन्ही वाहने येताच ती थांबवून झडती घेतली असता, वाहनांमध्ये विदेशी कंपनीच्या ९५ पेट्या दारू आढळून आली आहे. त्याचबरोबर दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्व मुद्देमालाची किमत २३ लाख रूपये एवढी होते. या प्रकरणी दीपक शिवकुमारसिंग (३२), दलजितसिंग गुरूबच्चनसिंग (२८) दोघेही रा. भिलाई छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीजी ०७ बीए ४०३०, सीजी ०७ एवाय १९४० क्रमांकाचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पीएसआय प्रविण जरदे, दानिश मन्सुरी, पोलीस हवालदार गावडे, सहारे, अन्नपत्रवार, मडकाम, मोखाडे, कोल्हे, पेंदाम, तोडासे, चिकराम, मडावी, चौधरी, ढोरे, उसेंडी यांनी केली.
चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, सचिन गावळे, सहायक फौजदार अशोक कुमरे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विष्णूपूर येथील नाल्याशेजारी असलेला मोहफूल दारूअड्डे उद्ध्वस्त करून येथून १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केले. पोलिसांनी लक्ष्मण निताई मंडल, उज्ज्वल हितेश मंडल, मनोज खितीश मंडल, लहु तारकेश्वर हलदर यांच्याकडून मोहफूल दारू, सडवा, दारूभट्टीकरिता लागणारे लोखंडी ड्रम, प्लास्टिक बॅरेल, चाटू, टिनाचे पिंप असा एकूण ५६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईतील नवग्राम जंगल परिसरातून मोहफूल दारूभट्टीवरून ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर मुद्देमाल राकेश रंगो दास, सरोजीत हर्षीद शिखधर, अजय सुखलाल हलदर यांच्याकडून जप्त केला. आरोपी जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक कापुरे, गावडे, सहायक फौजदार अशोक कुमरे यांच्यासह पोलीस हवालदार कोसनकर, नीलकंठ कोकोडे, रेमाजी धुर्वे, पोलीस शिपाई संतोष भांडेकर आदींनी केली.