२५ ग्रामसेवक बनले ग्रामविकास अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:51+5:302021-09-05T04:41:51+5:30
न्यायालयीन प्रकरणामुळे मागील सात वर्षांपासून ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडलेल्या होत्या. ग्रामसेवकांच्या पदाेन्नत्या व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्हा ...

२५ ग्रामसेवक बनले ग्रामविकास अधिकारी
न्यायालयीन प्रकरणामुळे मागील सात वर्षांपासून ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडलेल्या होत्या. ग्रामसेवकांच्या पदाेन्नत्या व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्हा ग्रामसेवक युनियनने यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र, एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मात्र हा मुद्द गंभीरतेने घेत. पात्र असलेल्या ग्रामसेवकांची ग्रामविकास अधिकारीपदी नियुक्ती केली. पदाेन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागांवर नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. यामुळे बेराेजगार, अनुकंपा उमेदवार यांना नाेकरीची संधी निर्माण झाली आहे.
यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, सरचिटणीस दामोदर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, कार्याध्यक्ष नवलाजी घुटके, उपाध्यक्ष रमण गंजीवार, संतोषी सडमेक, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, राज्य संघटिका अर्चना श्रीगिरीवार, ग्रामसेवक भवन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण मंगर यांनी पाठपुरावा केला हाेता.