आगीत २५ बंड्या तणीस जळून खाक
By Admin | Updated: June 20, 2016 01:01 IST2016-06-20T01:01:17+5:302016-06-20T01:01:17+5:30
तालुक्यातील मालेर चक येथे शेतशिवारात ठेवलेल्या तणसीच्या ढगाला आग लागल्याने २५ बंड्या तणीस जळून खाक झाल्याची घटना रविवारी घडली.

आगीत २५ बंड्या तणीस जळून खाक
चामोर्शी : तालुक्यातील मालेर चक येथे शेतशिवारात ठेवलेल्या तणसीच्या ढगाला आग लागल्याने २५ बंड्या तणीस जळून खाक झाल्याची घटना रविवारी घडली. यामुळे शेतकरी बाबाजी किसन नवघडे व तुळशीराम कान्हाजी गोहणे यांचे नुकसान झाले.
नागपूर चेक येथील शेतकरी बाबाजी नवघडे यांनी आपल्या शेतात १५ बंड्या तणीस ढिग करून ठेवली होती. तर सर्वे नंबर २९८ च्या शेतात तुळशीराम गोहणे यांनी १० बंड्या तणीस ढिग करून ठेवली होती. रविवारी दुपारच्या सुमारास या तणसीच्या ढिगाला अचानक आग लागली.
ग्रामस्थांनी अग्निशामक वाहन बोलावून पोलिसांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत तणीस जळून खाक झाली. शेतकरी तुळशीराम गोहणे यांचे पाच हजार व बाबाजी नवघडे यांचे ७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)