शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कृषीपंपधारकांकडे २४ कोटींचे बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:12 AM

जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : १८ हजार ६९८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने विहीर, नदी,नाले यावर पाणीपंप बसवून त्याच्या मदतीने शेतीला सिंचन केले जात आहे. शासन १०० टक्के अनुदानावर विहीर खोदून देत आहे. विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदत आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी स्वत:च्या पैशाने शेतात बोअरवेल खोदत आहेत. यातील पाणी बाहेर काढण्यासाठी पाणी पंपाची गरज भासते. यापूर्वी बहुतांश शेतकरी डिझेल इंजीनचा वापर पाणी काढण्यासाठी करीत होते. मात्र डिझेलचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर डिझेल इंजिनच्या देखभालीवर बराच खर्च होतो. हा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी आता विजेवर चालणारे पाणीपंप लावण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कृषीपंपांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हाभरात एकूण १८ हजार ६९८ कृषीपंपधारक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागात ७ हजार ८५२ तर गडचिरोली विभागात १० हजार ८४६ कृषीपंपधारक आहेत. कृषी पंपाच्या विज बिलाची वसुली न होणे हा महावितरण समोरील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कृषीपंपांच्या थकीत वीज बिलाचा आखडा वाढतच चालला आहे. शेतकºयांनी वीज बिल भरावे यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणाºया अनेक योजना सुरू केल्या मात्र शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. आलापल्ली विभागातील शेतकºयांकडे १२ कोटी ६५ लाख तर गडचिरोली विभागातील शेतकºयांकडे ११ कोटी ७१ लाख रूपये थकले आहेत. महावीतरण वीज बिलाच्या वसुलीबाबत अतीशय संवेदनशील आहे. सामान्य ग्राहकाचे दोन महिन्याचे वीज बिल थकले तरी त्याला वीज पुरवठा खंडीत केला जातो. या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांकडे कमी प्रमाणात विज बिल थकले आहे. शेतकरी विविध कारणांमुळे दरवर्षी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने महावितरण शेतकºयांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई एकाकी करीत नाही. मात्र शेतकºयांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकाºयांकडून केले जात आहे.वसुलीची धडक मोहीमएकूण वीज उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरली जाते. त्यामानाने वसुलीचे प्रमाण अतीशय कमी आहे. थकलेल्या वील बिलामुळे महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर विशेष भर देण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाºया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख ४० हजार, ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडे ९७ लाख, ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडे सुमारे २२५ कोटी रूपयांचे वीज बिल थकले आहे. थकलेल्या वीज बिलांमुळे महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय नाजुक झाली असल्याने वीज बिल वसुलीचे सक्त निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात वीज बिल वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती