शहर विकासासाठी २४३ कोटींची गरज

By Admin | Updated: February 23, 2015 01:34 IST2015-02-23T01:34:03+5:302015-02-23T01:34:03+5:30

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून ...

243 crore needed for city development | शहर विकासासाठी २४३ कोटींची गरज

शहर विकासासाठी २४३ कोटींची गरज

लोकमत विशेष
गडचिरोली : शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून सदर निधीची मागणी नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागांकडे केली आहे. त्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावाही करीत आहेत. सदर निधी प्राप्त झाल्यास शहराचे रूप पालटण्यास फार मोठी मदत होणार आहे.
गडचिरोलीला जिल्हास्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यालये येऊ लागले. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी गडचिरोलीमध्ये राहू लागले. त्यांच्या गरजा पूर्ण करताना इतरांनाही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने इतरही नागरिकांचे पाय गडचिरोलीच्या दिशेने वळायला लागले. त्यामुळे गडचिरोली शहराची लोकसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. वाढलेल्या लोकसंख्येला जुन्या साधनांच्या मदतीने आवश्यक सोयीसुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरात काही नवीन बांधकाम होणे गरजेचे आहे.
गडचिरोली नगर परिषदेला ‘ब’ दर्जा आहे. त्यामुळे शासनाकडून या नगर परिषदेला अत्यंत मर्यादीत प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी शहरवासीयांना दैनंदिन सोयीसुविधा पुरविण्यातच खर्च होतो. त्यामुळे नवीन विशेष बांधकाम करणे शक्य होत नाही. त्यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधित विभागांकडे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे करताना नगर परिषद प्रशासनाला फार मोठी कसरत करावी लागत आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाण्याचा मुबलक पुरवठा वर्षभर होतो. पाण्याचा उपसा करण्यापासून ते शुध्दीकरण करण्यासाठी नगर परिषदेचे महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. मात्र नागरिक नळांना तोट्या लावत नाही. यावर आवर घालण्यासाठी नळांना मिटर लावल्या जाणार आहेत. त्यासाठी निधीची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरज
शहरात १४१.४० किमीच्या नाल्या व १७०.५० किमींच्या रस्त्यांचे बांधकाम झाले आहे. वाढत्या लोकवस्तीसाठी आणखी ५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरज आहे. दोन बगिचे, ३० पैकी १३ ओपन स्पेसचा विकास, मोक्षधाम, तीन शॉपींग काम्प्लेक्स, आठवडी बाजाराचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे.
२३ आरक्षित भूखंडांचा विकास, नगर भूमापन करणे, २२ किमीचे सर्विस रोड तयार करणे व ६ हजार नळांना वॉटर मिटर लावण्यासाठी निधीची गरज आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी दोन पाण्याच्या टाक्याचंी गरज आहे.
भूयारी गटार योजना ही शहराचे रूप पालटण्यासाठी मदत करणारी महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेसाठी राज्य व केंद्राकडून निधी प्राप्त होणार आहे. भूयारी गटारामुळे शहरात स्वच्छता राहण्यास फार मोठी मदत होणार आहे.

Web Title: 243 crore needed for city development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.