२,३३१ नमुने दूषित
By Admin | Updated: December 30, 2014 23:33 IST2014-12-30T23:33:14+5:302014-12-30T23:33:14+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक महिन्यात शहर, ग्रामीण व दुर्गम भागातील सार्वजनिक पिण्याच्या पाणी स्त्रोताची तपासणी केली जाते. जुलै ते नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत प्रत्येक महिन्यात

२,३३१ नमुने दूषित
पाच महिन्यांत : शेकडो गावातील जलस्त्रोत दूषित असल्याचे झाले उघड
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक महिन्यात शहर, ग्रामीण व दुर्गम भागातील सार्वजनिक पिण्याच्या पाणी स्त्रोताची तपासणी केली जाते. जुलै ते नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत प्रत्येक महिन्यात पाणी स्त्रोताची तपासणी करण्यात आली. यात एकूण २ हजार ३३१ स्त्रोतांतील पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्रयोगशाळेच्यावतीने प्रत्येक महिन्यात ४ हजाराहून अधिक पाणी स्त्रोताची तपासणी करण्यात येते. यात सार्वजनिक पाणी पुरवठ्यांच्या स्त्रोतांमध्ये सार्वजनिक विहीर, कुपनलिका व हातपंप यासह पिण्याचे पाणी वापरत असलेल्या काही ठिकाणाचांही समावेश असतो. जि.प. आरोग्य विभागाच्यावतीने २०१४ च्या जुलै महिन्यात बाराही तालुक्यात एकूण ३ हजार ५९८ स्त्रोतातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ६२९ स्त्रोतातील नमुने दुषित आढळून आले असून याची टक्केवारी १७ आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्हाभरात एकूण ४ हजार ९६ स्त्रोतातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये ६११ दुषित नमुने आढळून आले असून याची टक्केवारी १७ आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ४ हजार ४८ स्त्रोतातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ६५४ नमुने दुषित आढळले असून याची टक्केवारी १६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एकूण २ हजार ४३५ स्त्रोतातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. यामुळे दुषित नमुने २२९ आढळले, याची टक्केवारी ९ आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात एकूण २ हजार ५६१ स्त्रोतातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. २०८ दुषित नमुने आढळूल असून दुषित नमुन्याची टक्केवारी ८ आहे. नियमित टीसीएल, ब्लिचिंग पावडर व मेडीक्लोअरचा वापर करण्यात येत नसल्याने दुषित पाण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.