२३ निराधारांना मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:20+5:302021-09-02T05:19:20+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वच ९ प्रकरणे मंजूर ...

२३ निराधारांना मिळणार अनुदान
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वच ९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत १०पैकी ८ प्रकरणे मंजूर व २ नामंजूर करण्यात आली. केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत प्राप्त सर्वच ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्वच २ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
या बैठकीला संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष घनश्याम राऊत, अशासकीय सदस्य लालाजी परसा, प्रकाश मारभते, बाबुराव गेडाम, किरण शेडमाके, कल्पना सहारे, शांताबाई परसे व शासकीय सदस्य संवर्ग विकास अधिकारी एम. ई. कोमलवार, मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी गुलाब ठाकरे, समितीचे सदस्य, सचिव, नायब तहसीलदार सी. जी. पितुलवार, डी. एम. वाकुलकर, संगायो शाखेचे अव्वल कारकून एम. एच. मडावी, महसूल सहाय्यक पी. एफ. खोब्रागडे आदी उपस्थित हाेते.
310821\img-20210830-wa0077.jpg
संजय गांधी निराधार समितीची बैठक