जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

By Admin | Updated: February 26, 2016 01:43 IST2016-02-26T01:43:04+5:302016-02-26T01:43:04+5:30

पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, ...

23 crores sanctioned for old martyrs | जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

मुख्यमंत्र्यांची घोषणा : १० आत्मसमर्पितांना भूखंड प्रदान
पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्मसमर्पण केलेले रामजी मुन्शी मट्टामी, रामजी कवडो मंजी, भिमा राजू नरोटे, आशा तानू हिचामी, सुशीला दिनानाथ दुग्गा, रमेश कोंडू आतला, रमेश आतलामी, सरीता वड्डे, रामको आतला, मिरा गोंडलू यांना भूखंडांच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. काही आत्मसमर्पित नक्षल्यांना धनादेशाचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमाप्रसंगी संड्रा नावाच्या महिला नक्षलवादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सी-६० चे जवान हर्षल काळे व त्यांची चमू, संतोष नैताम, प्रभाकर मडावी यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शौर्यपदक प्राप्त करणाऱ्या मनोहर कोरामी व चंद्रय्या कोरामी, गंगाराम सिडाम, नागेश्वर कुमराम यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, चुकीच्या मार्गाने गेलेल्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी पुनर्वसन, रोजगार यासारख्या अनेक योजना शासनाने राबविल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीचे मनोबल कमी झाले आहे. जे नागरिक अजुनही मुख्य प्रवाहात आले नाहीत. त्यांना यमसदनी पाठविण्याची कामगिरीही पोलीस विभाग अत्यंत चोख पध्दतीने बजावत आहे. नक्षलवादाचा पूर्ण बीमोड केल्यास विकासाला गती प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: 23 crores sanctioned for old martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.