मुस्का येथील सामूहिक विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: March 2, 2015 01:22 IST2015-03-02T01:22:10+5:302015-03-02T01:22:10+5:30
पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या वतीने मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले.

मुस्का येथील सामूहिक विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध
मालेवाडा : पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या वतीने मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले.
सामूहिक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, प्रभारी अधिकारी दिलीप पवार, उपकमांडंट राजेंद्रसिंह, डॉ. नितीन परचाके, पोलीस उपनिरिक्षक अजित कपासे, सीआरपीएफ चार्ली कंपनी १९१ बटालियनचे पोलीस निरीक्षक लायक अली, सागर काथे, डॉ. आर. के. ठवरे, डी. एन. सोनपिपरे, धानोराचे कृषी अधिकारी ए. जी. मेश्राम, सरपंच तनुजा कुमरे, पोलीस पाटील देवांगना वासनिक, बळीराम मारगाये आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्च वधू व वरपित्यांना उचलणे कठीण झाले आहे. अनेक पालकांना कर्ज काढूनच मुलीचे लग्न करावे लागते. यावर उपाय म्हणून मुस्का परिसरातील तंटामुक्त समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सदर आयोजन मुस्काचे तंमुस अध्यक्ष गजानन चंदनखेडे, कुलकुलीचे अध्यक्ष लक्ष्मण उईके, निमगावचे अध्यक्ष बाबुराव हलामी, पोलीस पाटील श्रीदास गेडाम, मुकरू उसेंडी, शिवराम हलामी, एकनाथ मेश्राम यांनी केले. या विवाह सोहळ्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले.
विवाह सोहळ्यानंतर वधुवरांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या मार्फतीने नवदाम्पत्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे अनुदान मिळवून दिले जाणार आहे. यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करेल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी दिले. (वार्ताहर)