राईस मिलमधून २२० नग सागवान व बिजा माल जप्त
By Admin | Updated: September 10, 2015 01:36 IST2015-09-10T01:36:42+5:302015-09-10T01:36:42+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुरेखडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एम. गाजलवार व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ...

राईस मिलमधून २२० नग सागवान व बिजा माल जप्त
एक आरोपी ताब्यात : कुरखेडा वनपरिक्षेत्रात कारवाई
कुरखेडा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुरेखडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एम. गाजलवार व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील नान्ही येथील सुरेश राईस मिलमध्ये बुधवारी धाड टाकून १.३९५ घन मीटरचे सागवानचे १३६ नग व बिजाचे १.४६४ घन मीटरचे ८४ असे एकूण २२० नग जप्त केले. सदर मालाची किंमत एक लाख रूपयांपेक्षा अधिक आहे.
सागवान व बिजा तस्करी प्रकरणी सुरेश राईस मिलचे मालक सुरेश उईके याला वनाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई वडसा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कोडापे, आदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एम. गाजलवार, क्षेत्रसहायक एस. जे. ताजणे, वनरक्षक एम. एच. राऊत, व्ही. जी. बोरकुटे, ए. पी. धात्रक, वनपाल ए. आर. दासलवार यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी एस. एम. गाजलवार करीत आहेत.
कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून सागवान तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी धाडसत्र राबविणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)