छत्तीसगडमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा; राखीव दलाचा एक जवान शहीद

By गेापाल लाजुरकर | Updated: March 20, 2025 18:41 IST2025-03-20T18:12:24+5:302025-03-20T18:41:18+5:30

Gadchiroli : दाेन जिल्ह्यांत चकमकी; महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटक

22 Naxalites killed in Chhattisgarh; One Reserve Force jawan martyred | छत्तीसगडमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा; राखीव दलाचा एक जवान शहीद

30 Naxalites killed in Chhattisgarh; One Reserve Force jawan martyred

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली
गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या बिजापूर-दंतेवाडा व कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गुरुवारी (दि.२० मार्च) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या पाेलिस- नक्षली चकमकी उडाल्या. या दाेन्ही चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. मात्र, एक जिल्हा राखीव दलातील जवान शहीद झाला. बिजापूर २६ नक्षलवादी ठार तर कांकेरमध्ये ४ नक्षलवादी ठार एकूण ३० नक्षलवादी ठार झाले. 

छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल परिसरात पाेलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गुरुवारी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. याचवेळी जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गाेळीबारात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.

कांकेर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमाभागात दुसरी चकमक उडाली. यात चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटक
नव्या वर्षाच्या सुरुवातीला ९ फेब्रुवारीला बिजापूर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते. यावेळी दाेन जवान शहीद झाले होते. मागील आठवड्यात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तब्बल १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. फेब्रुवारीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली हाेती.

Web Title: 22 Naxalites killed in Chhattisgarh; One Reserve Force jawan martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.