तीन तरुणांसह २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:09+5:302021-04-22T04:38:09+5:30
बुधवारी घेतलेल्या नोंदीनुसार नव्याने ५९० जण कोरोनाबाधित झाले. तसेच १७७ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६५१९ ...

तीन तरुणांसह २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठले
बुधवारी घेतलेल्या नोंदीनुसार नव्याने ५९० जण कोरोनाबाधित झाले. तसेच १७७ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६५१९ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२४१९ वर पोहचली आहे. सध्या ३८३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या २१ मृत्यूमध्ये २६ वर्षीय युवक अहेरी, ४४ वर्षीय पुरुष कुरखेडा, ४३ वर्षीय पुरुष गडचिरोली, ५२ वर्षीय पुरुष देसाईगंज, ४७ वर्षीय पुरुष देसाईगंज, ६२ वर्षीय महिला कुरखेडा, ३२ वर्षीय युवक धानोरा, ५५ वर्षीय महिला ता. नागभिड, जि. चंद्रपूर, ७४ वर्षीय पुरुष गडचिरोली, ६३ वर्षीय पुरुष गडचिरोली, ३३ वर्षीय युवक कुरखेडा, ४२ वर्षीय पुरुष अहेरी, ५१ वर्षीय पुरुष देसाईगंज, ७० वर्षीय महिला गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष गडचिरोली, ६७ वर्षीय पुरुष कुरखेडा, ७१ वर्षीय पुरुष ता. लाखांदूर, जि.भंडारा, ७३ वर्षीय पुरुष देसाईगंज, ७० वर्षीय महिला आरमोरी, ८२ वर्षीय पुरुष ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर, ७६ वर्षीय पुरुष गडचिरोली यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.१८ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २३.२४ टक्के तर मृत्यूदर १.५८ टक्के झाला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या १७७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ८७, अहेरी ३, आरमोरी १६, भामरागड ५, चामोर्शी २९, धानोरा १३, एटापल्ली २, मुलचेरा १, सिरोंचा २, कोरची १, कुरखेडा १३, तसेच देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे.
(बॉक्स)
असे आहेत नव्याने बाधित रुग्ण
नवीन ५९० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८१, अहेरी तालुक्यातील ५१, आरमोरी ७०, भामरागड तालुक्यातील १३, चामोर्शी तालुक्यातील ३५, धानोरा तालुक्यातील ३५, एटापल्ली तालुक्यातील ३९, कोरची तालुक्यातील १८, कुरखेडा तालुक्यातील ४७, मुलचेरा तालुक्यातील १०, सिरोंचा तालुक्यातील १८ तर देसाईगंज तालुक्यातील ७३ जणांचा समावेश आहे.