चामोर्शीत आढळले २१ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:17+5:30

चामोर्शीतील बाधितांमध्ये आंबेडकर वॉर्डातील १७ जण व नगर पंचायत क्षेत्रातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड राज्यातून अहेरीत आलेले २ बांधकाम व्यावयायिक, गडचिरोलीतील ५ जण यामध्ये १ कैदी, १ पोलीस, नागपूरवरून आलेला १ व जिल्हा रूग्णालयातील २ जणांचा समावेश आहे. १ जण सिरोंचातील आहे. कोरचीतील २ व गडचिरोतील १ असे एकूण ३ जण कोरोनामुक्त झाले.

21 corona infected patients found in Chamorshi | चामोर्शीत आढळले २१ कोरोना बाधित रुग्ण

चामोर्शीत आढळले २१ कोरोना बाधित रुग्ण

ठळक मुद्देजिल्हाभरात २९ पॉझिटिव्ह । २३२ जणांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/चामोर्शी : शनिवारी नगर पंचायत भवन चामोर्शीत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २८९ नागरिकांची तपासणी केली असता २१ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी ८ बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता १०८७ झाली आहे.
चामोर्शीतील बाधितांमध्ये आंबेडकर वॉर्डातील १७ जण व नगर पंचायत क्षेत्रातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड राज्यातून अहेरीत आलेले २ बांधकाम व्यावयायिक, गडचिरोलीतील ५ जण यामध्ये १ कैदी, १ पोलीस, नागपूरवरून आलेला १ व जिल्हा रूग्णालयातील २ जणांचा समावेश आहे. १ जण सिरोंचातील आहे. कोरचीतील २ व गडचिरोतील १ असे एकूण ३ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ८५४ झाली आहे. २३२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. चामोर्शीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर यांच्या मार्गदर्शनात तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. नागरिक स्वत:हून तपासणी करण्यासाठी येत आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास तपासणीसाठी नारिकांची रांग लागली होती. सलग तिसऱ्याही दिवशी चामार्शीतील बाजारपेठ बंद होती एकूण बांधितांची संख्या ११९ झाली आहे. महत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथळे यांनी केले आहे.

Web Title: 21 corona infected patients found in Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.