२० कोटी ९६ लाखांची हातपंप वसुली थकित
By Admin | Updated: September 21, 2015 01:23 IST2015-09-21T01:23:10+5:302015-09-21T01:23:10+5:30
जिल्हा परिषदेच्या हातपंप व यांत्रिकी विभागाची जुनी थकीत व चालू वर्षातील मिळून बाराही तालुक्यातील ...

२० कोटी ९६ लाखांची हातपंप वसुली थकित
धानोरा, अहेरी तालुका पिछाडीवर : ग्रामपंचायतीची उदासीनता चव्हाट्यावर
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या हातपंप व यांत्रिकी विभागाची जुनी थकीत व चालू वर्षातील मिळून बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतींवर तब्बल २० कोटी ९६ लाख १ हजार ४३८ रूपयांची हातपंप देखभाल व दुरूस्तीची वसुली थकीत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे १० लाख ९१ हजार १२१, आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ९९ लाख ४ हजार ३०८, कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर १ कोटी ४३ लाख ४ हजार ९१४, धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर १९ लाख ६४ हजार ११०, चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर १० लाख २२ हजार ६७१, अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर ७७ लाख २४ हजार ८७२, एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायतींवर १२ लाख २४ हजार ३०८, सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर १३ लाख ८३ हजार ९०८, कोरची तालुक्यातील ग्रामपंचायतींवर ७० लाख ७ हजार ४१९, देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींवर ५५ लाख ८ हजार ८१५, भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर २८ लाख ४७ हजार ८७३ रूपयांची हातपंप कर वसुली थकीत आहे. धानोरा व अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायती कर अदा करण्यात पिछाडीवर असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)