शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

२०,७६५ शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:05 IST

पीकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. परिणामी जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत केवळ २० हजार ७६५ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यापैकी २० हजार २८८ शेतकरी हे कर्जदार आहेत.

ठळक मुद्देयोजनेवरचा विश्वास उडाला : कर्ज घेणाऱ्यांना सक्ती केल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. परिणामी जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत केवळ २० हजार ७६५ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यापैकी २० हजार २८८ शेतकरी हे कर्जदार आहेत.शेतकºयांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देऊन नैसर्गिक आपत्तीच्या काळात दिलासा मिळावा यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विम्याच्या रकमेसोबत राज्य आणि केंद्र सरकारही काही रक्कम विमा कंपनीकडे भरते. मात्र गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीनंतरही शेतकºयांना विमा कंपनीकडून अपेक्षित नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे पिकांचा विमा काढून फायदा झाल्याचा अनुभव सांगायला कोणीही शेतकरी तयार नाही. तरीही पीक विमा काढण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून दबाव टाकला जात आहे. कर्ज घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना इच्छा नसुनही विमा काढावा लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत कृषी कर्ज घेणाऱ्या २० हजार २८८ शेतकºयांनी तसेच कर्ज न घेणाऱ्या केवळ ४७७ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे.सर्वाधिक विमा उतरविणारे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहक आहेत. या बँकेमार्फत यावर्षी आतापर्यंत १३ हजार ५७२ शेतकऱ्यांनी, बँक आॅफ इंडियामार्फत २५७९ शेतकऱ्यांनी, बँक आॅफ महाराष्ट्र मार्फत १४६० शेतकऱ्यांनी, स्टेट बँक आॅफ इंडियामार्फत १२०९ शेतकºयांनी तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत १६११ शेतकºयांनी पिकांचा विमा काढला आहे. यातून २४ हजार ७०८ हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे.पिकनिहाय असा आहे पीक विम्याचा हप्तासरकारने पीक विम्याचा कंत्राट आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीला दिला आहे. यात भात (धान) पिकासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रतिहेक्टरी ५९७.५० रुपये, सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ६४७.५० रुपये, तर कापूस पिकासाठी प्रतिहेक्टरी १६८१.२५ रुपये शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. यात केंद्र व सरकारचा वाटा मिळून सदर विमा कंपनी दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवित आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ येते त्यावेळी निकषात बसत नसल्याचे सांगत भरपाईपासून वंचित ठेवले जाते.विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरले १.६२ कोटीयावर्षी आतापर्यंत एकूण २० हजार ७६५ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यापैकी कर्जदार शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीला विम्याचा एकरकमी हप्ता म्हणून १ कोटी ६० लाख ९१ हजार रुपये भरले आहेत. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १ लाख ९३ हजार रुपये विम्याचा हप्ता भरला आहे.शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे भरलेल्या रकमेच्या दीड पट रक्कम राज्य सरकार तर दीड पट रक्कम केंद्र सरकार विमा कंपनीकडे भरते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्यापोटी आतापर्यंत विमा कंपनीला साडेसहा कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा