२०२७ प्रमाणपत्र वाटप

By Admin | Updated: February 1, 2016 01:26 IST2016-02-01T01:26:48+5:302016-02-01T01:26:48+5:30

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने आॅनलाईन नोंदणी ....

2027 certificate allocation | २०२७ प्रमाणपत्र वाटप

२०२७ प्रमाणपत्र वाटप

वर्षभरात : अपंग व्यक्तींना मिळाला दिलासा; दर गुरूवारी होते नोंदणी
दिलीप दहेलकर गडचिरोली
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने आॅनलाईन नोंदणी केलेल्या अपंग व्यक्तींची शारीरिक व वैद्यकीय तपासणी करून पात्र झालेल्या २ हजार २७ अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा रूग्णालयातर्फे वर्षभरात अपंगत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेल्या अपंगांमध्ये अंधत्व १६१, कर्णबधीर १५९, मानसिक आजार असलेले ११, मानसिक रूग्ण असलेले ९१, अस्थीव्यंगाचे ८७३ व इतर प्रकारचे अपंगत्व असलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी अपंग प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेल्यांमध्ये अंधत्व व्यक्ती १७२, कर्णबधीर १२, मानसिक आजार एक, इतर पाच, मानसिक रूग्ण असलेले १६ व अस्थीव्यंग असलेल्या २२५ अपंग नागरिकांचा समावेश आहे. वर्षभरात जिल्हा सामान्य रूग्णालयात एकूण २ हजार २३३ विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींनी आॅनलाईन नोंदणी केली. या सर्वांचे वैद्यकीय तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले. अपंगत्व प्रमाणपत्र वाटपाची टक्केवारी ८० आहे.
सन २०१६ च्या जानेवारी महिन्यात जवळपास अडीचशे अपंग व्यक्तींनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी रूग्णालय प्रशासनाकडे आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून प्रमाणपत्रही तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जानेवारी महिन्यात १०० वर अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

२०८ जण प्रमाणपत्रासाठी ठरले अपात्र

अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात आॅनलाईन नोंदणी केलेल्या २०८ अपंग व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र या तपासणीत ४० टक्क्याच्या आत अपंगत्व आढळून आल्याने त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये अस्थीव्यंग २००, कर्णबधीर सहा, मानसिक आजार एक व अंधत्व असलेल्या एका अपंगांचा समावेश आहे.

१५ जणांची चमू सेवेत
गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आठवड्यातून एकदा दर गुरूवारी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अपंग व्यक्तींची आॅनलाईन नोंदणी करून त्यांची शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते. या कामासाठी जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, अस्थीरोग, बालरोग, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ व कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांसह एकूण १५ कर्मचाऱ्यांची चमू सेवेत कार्यरत आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी दिली आहे.

Web Title: 2027 certificate allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.