मेळाव्यात २०२ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:22 IST2017-10-16T22:22:34+5:302017-10-16T22:22:54+5:30
उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.

मेळाव्यात २०२ जोडपी विवाहबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.
विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, गणेश मोरे, अप्पासाहेब पडळकर, व्यंकट गंगलवाड यांच्यासह महाराष्टÑ पोलीस मित्र परिवार पुणे, एनएनएस टीमचे सदस्य, आठवण गु्रपचे सदस्य, अविष्कार अॅकॅडमीचे सदस्य उपस्थित होते. २०२ जोडप्यांची उपपोलीस स्टेशनमधून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातून फेरी घातल्यानंतर मिरवणुकीचा समारोपही पोलीस स्टेशनमध्येच करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान नागरिक तसेच पोलीस अधिकाºयांनी ढोल, ताशांच्या गजरावर ताल धरला. या मेळाव्याला आशा, वेलगूर, भंगारामपेठा, दामरंचा या गावातील जवळपास तीन हजार नागरिक उपस्थित होते. लग्न समारंभासाठी आलेल्या वºहाड्यांसाठी भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतीसाठी शासन शेकडो कोटी रूपये खर्च करीत आहे. या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीपूरक रोजगार करावा, धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. गावातील ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून याबाबतची माहिती घ्यावी व अर्ज करावा, पोलीस विभाग नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी तत्पर आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग सुद्धा पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी नक्षल्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गायकवाड यांनी केले. पोलीस विभागाच्या वतीने जोडप्यांना भेट वस्तू देण्यात आले.