चांदाळा-कुंभी परिसरातील २० क्विंटल मोहसडवा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:54+5:302021-05-08T04:38:54+5:30
चांदाळा गावात माेठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जाते. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगाटा ...

चांदाळा-कुंभी परिसरातील २० क्विंटल मोहसडवा केला नष्ट
चांदाळा गावात माेठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जाते. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगाटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावांतसुद्धा दारू पुरविली जाते. सोबतच गावात मद्यपींची लाइन लागलेली असते. यामुळे दारू विक्रेते माेठ्या प्रमाणात दारू गाळतात. दारू पिऊन अनेक जण भांडण-तंटे करतात. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या. गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या चांदाळा परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार चांदाळा व कुंभी गावादरम्यान असलेल्या सराड परिसरात शोधमोहीम राबवीत दारू अड्डे उद्ध्वस्त केले, तसेच पाच ते सहा ठिकाणी टाकलेला १ लाख २४ हजार २०० रुपये किमतीचा २० क्विंटल मोहसडवा व १० लिटर दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी रतन मादगू उसेंडी रा. चांदाळा, दिलीप नामदेव शेंडे, रेवनाथ कवडू सोनुले, दोन्ही रा. मुडझा या तिघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ॲक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील मुजोर गावातील दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. आतापर्यंत मुजोर गाव म्हणून ओळख असलेल्या अलोनी, चांदाळा येथे केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारू विक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार यांच्या नेतृत्वात हवालदार अरविंद सिडाम, चंद्रभान मडावी, आत्माराम घोनाडे, महेश हलामी, सचिन आडे, किशोर खोब्रागडे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
===Photopath===
070521\07gad_6_07052021_30.jpg
===Caption===
जप्त केलेल्या मुद्देमालासह आराेपी व साेबत पाेलीस तसेच मुक्तिपथ चमू.