जिल्ह्यात २० कोरोनामुक्त, तर नवीन १५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:57+5:302021-07-15T04:25:57+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ३०४६८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९५८४ वर पोहोचली, तसेच सध्या १४३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

20 corona free in the district, while 15 new are affected | जिल्ह्यात २० कोरोनामुक्त, तर नवीन १५ बाधित

जिल्ह्यात २० कोरोनामुक्त, तर नवीन १५ बाधित

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ३०४६८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९५८४ वर पोहोचली, तसेच सध्या १४३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७४१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१० टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.४७ टक्के, तर मृत्यूदर २.४३ टक्के झाला.

नवीन १५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील ३, आरमोरी १, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील ४, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये एका जणाचा समावेश आहे. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या २० रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २, आरमोरी १, एटापल्ली १, मुलचेरा २, सिरोंचा १३, कोरचीतील एका जणाचा समावेश आहे.

Web Title: 20 corona free in the district, while 15 new are affected