२० प्रकरणे काढली निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:26 IST2018-02-12T00:24:44+5:302018-02-12T00:26:12+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार आरमोरी व चामोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले.

२० प्रकरणे काढली निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/चामोर्शी : न्यायालयाच्या आदेशानुसार आरमोरी व चामोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी आरमोरी येथे एकूण १४ तसेच चामोर्शी येथे सहा प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.
आरमोरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित खटले व बँक, एमएसईबी, पाणी कर व इतर दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी फौजदारी प्रलंबित सहा व एक दिवाणी प्रकरण ठेवण्यात आले होते. यापैकी तीन फौजदारी प्रकरणे ४१ हजार रूपयांच्या रकमेने निकाली काढण्यात आली. तसेच दाखलपूर्व १६३ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे, ३१ हजार तसेच एमएसईबीच्या ११० प्रकरणांपैकी तीन प्रकरणे २ हजार ९३० एवढ्या रकमेने निकाली काढण्यात आली. दाखलपूर्व एकूण तीन प्रकरणांपैकी महिला बचत गटाची दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक न्यायालयाला दिवाणी न्यायाधीश संजय अटकारे, अभिवक्ता बी. बी. जांभूळकर, पॅनल सदस्य आर. आर. पाचपांडे उपस्थित होते. याप्रसंगी सहायक अधीक्षक काकडे, प्रतिभा आत्राम, देवकर, रामटेके, पाटील, दोनाडकर, रामटेके यांनी सहकार्य केले.
चामोर्शी येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने राष्टÑीय लोकअदालीचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण दिवाणी स्वरूपाचे १२ व फौजदारी स्वरूपाचे १३ व वादपूर्व राष्ट्रीयकृत बँकेचे ८२ व विद्युत विभागाचे ५० असे एकूण १३२ प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी न्यायालयातील प्रलंबित तीन प्रकरणात तसेच विद्युत विभागाच्या तीन प्रकरणात समजोता करण्यात आला, असे एकूण सहा प्रकरणे लोकअदालतीत निकाली काढण्यात आली. लोकअदालतीला पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी एम. झेड. ए. ए. क्यू. कुरेशी यांनी काम पाहिले. सदस्य म्हणून अॅड. अमर तुरे, अनिल कुकडकार यांनी काम पाहिले. याप्रसंगी अॅड. के. टी. सातपुते, अॅड. डिम्पल उंदीरवाडे, अॅड. व्ही. जी. चिळंगे, अॅड. एम. डी. सहारे उपस्थित होते. पुणेकर, पी. डी. कोसारे, नेताजी करंडे, विनायक सहारे, सुधाकर भिसे, आशिष भुर्रे, महल्ले, जयंत मल्लेलवार, लता उईके, पोहरकर यांनी सहकार्य केले.