२ हजार ९३ पोस्टल मतदार
By Admin | Updated: October 8, 2014 23:26 IST2014-10-08T23:26:43+5:302014-10-08T23:26:43+5:30
सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान करण्याकरिता ईव्हीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी, बंदोबस्तात असलेले जवान यांनाही मतदान करता यावे,

२ हजार ९३ पोस्टल मतदार
गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान करण्याकरिता ईव्हीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी, बंदोबस्तात असलेले जवान यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोष्टल मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिरोली, आरमोरी, अहेरी हे तिनही विधानसभा क्षेत्र मिळून सध्य:स्थितीत २ हजार ९३ एवढे पोष्टल मतदार आहेत. नमुना १२ चे अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पोष्टल मतदारांच्या संख्येनेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १५ आॅक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के पोष्टल मतदान होण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
६७ आरमोरी विधानसभा क्षेत्रात ईडीसी नमूना १२ अ मधील एकूण ८०६ पोष्टल मतदार आहेत. पीबी नमूना १२ मधील २६ मतदार व सेवेतील मतदारांची संख्या ९२ असे एकूण ९२४ पोष्टल मतदार आहेत. ६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ईडीसी नमूना १२ मधील ६२९, पीबी नमूना १२ मधील ७० व सेवेतील मतदार ९३ असे एकूण ७९२ पोष्टल मतदार आहेत. ६९ अहेरी विधानसभा क्षेत्रात एकूण ३७७ पोस्टल मतदार आहेत. यामध्ये ईडीसी नमूना १२ अ मधील २७५, पीबी नमूना १२ मधील ५५ व सेवेमधील मतदारांची संख्या ४७ आहे. सध्य:स्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात पीबी नमूना १२ नुसार २० पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. सेवेतील ९२ मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सेवेतील ७८ मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील पीबी नमूना १२ नुसार एका मतदाराला व सेवेतील ४७ अशा एकूण ४८ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. तिनही विधानसभाक्षेत्र मिळून ५ आॅक्टोबरपर्यंत २३८ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे.
तिनही विधानसभाक्षेत्र मिळून एकूण १ हजार ८४९ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिकेचे वितरण करणे शिल्लक आहे. मतदानाच्या दोन दिवसापूर्वी उर्वरित सर्व पोष्टल मतदारांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने पोष्टल मतपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोष्टल मतदारांमध्ये मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणजे केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.
ज्या विधानसभा क्षेत्रातील ज्या मतदान केंद्रावर मतदान तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्याच मतदान केंद्रावर पोष्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पोष्टल मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)