१९६ जणांनी केली काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST2021-05-31T04:26:35+5:302021-05-31T04:26:35+5:30

काेराेनाबाधितांची एकूण संख्या २९ हजार ३०२ झाली आहे. त्यापैकी २७ हजार ६६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ९१६ ...

196 defeated Kelena | १९६ जणांनी केली काेराेनावर मात

१९६ जणांनी केली काेराेनावर मात

काेराेनाबाधितांची एकूण संख्या २९ हजार ३०२ झाली आहे. त्यापैकी २७ हजार ६६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ९१६ रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७१८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज झालेल्या ४ नवीन मृत्यूमध्ये रा. कुरुड, ता. देसाईगंज येथील ६५ वर्षीय पुरुष, रा. नीलमगुंडा, ता. अहेरी येथील ६५ वर्षीय महिला, रा. कालिनगर ता. मुलचेरा येथील ६५ वर्षीय महिला, रा. रानमूल, ता. गडचिरोली येथील ४४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नवीन ६५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३, अहेरी तालुक्यातील १०, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील १४, धानोरा तालुक्यातील ३, एटापल्ली तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील ५, मुलचेरा ४, सिरोंचा ३, तर देसाईगंज येथील ६ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या १९६ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ५१, अहेरी २५, भामरागड ४, चामोर्शी ३७, धानोरा ४, एटापल्ली ४, मुलचेरा १४, सिरोंचा २५, कोरची १, कुरखेडा ९ तसेच वडसा येथील २२ जणांचा समावेश आहे.

Web Title: 196 defeated Kelena