१.८४ लाखांची नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:31 IST2019-06-22T00:29:45+5:302019-06-22T00:31:33+5:30
एलपीजी गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर लिक असल्यामुळे झालेल्या स्फोटात ग्राहक शालू परमानंद रामटेके यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. ग्राहकाने केलेल्या दाव्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पेरेशनतर्फे सदर ग्राहकास १ लाख ८४ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.

१.८४ लाखांची नुकसानभरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : एलपीजी गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर लिक असल्यामुळे झालेल्या स्फोटात ग्राहक शालू परमानंद रामटेके यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. ग्राहकाने केलेल्या दाव्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पेरेशनतर्फे सदर ग्राहकास १ लाख ८४ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.
येथील अरिहंत गॅस एजन्सीच्या संचालिका मनीषा दोशी यांच्या हस्ते लाभार्थी शालू रामटेके यांना सदर रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. चामोर्शी तालुक्याच्या मुरखळा माल येथील शालू परमानंद रामटेके यांनी अरिहंत गॅस एजन्सीकडून गॅस कनेक्शन घेतले होते. दरम्यान १६ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांच्या घरच्या सिलिंडरचे रेग्युलेटर लिक झाल्यामुळे स्फोट झाला. यात घरातील अनेक साहित्य जळून खाक झाले होते. मात्र या घटनेत जीवितहानी झाली नाही. सेल्स अधिकाऱ्यांतर्फे पंचनामा करून प्रकरण दाखल करण्यात आले. स्थानिक गॅस एजन्सीनेसुद्धा नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा केला.
संबंधित कंपनीने क्लेम मान्य करून १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा धनादेश स्थानिक गॅस एजन्सीमार्फत ग्राहक लाभार्थी शालू रामटेके यांना प्रदान केला.