१३ मृत्यूसह १८० नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST2021-05-23T04:36:59+5:302021-05-23T04:36:59+5:30

आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २८ हजार ५४२ झाली असून त्यापैकी २६ हजार १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ६८३ ...

180 new patients with 13 deaths | १३ मृत्यूसह १८० नवीन रुग्ण

१३ मृत्यूसह १८० नवीन रुग्ण

आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २८ हजार ५४२ झाली असून त्यापैकी २६ हजार १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ६८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नव्याने भर पडलेल्या १३ मृत्यूमध्ये ४३ वर्षीय पुरुष जाफराबाद ता.सिरोेंचा, ४८ वर्षीय पुरुष घोट ता.चामोर्शी, ४५ वर्षीय पुरुष मुडझा ता.गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर, ३९ वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, ५३ वर्षीय महिला आरमोरी, ६५ वर्षीय महिला इंदिरा नगर गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष चिंनगाव ता.कुरखेडा, ३२ वर्षीय पुरुष विठ्ठलपूर ता.चामोर्शी, ६२ वर्षीय महिला कोरेगाव ता.वडसा, ६२ वर्षीय महिला कोतुर, ता.अहेरी, ४० वर्षीय पुरुष सोनसरी ता.कुरखेडा, ५५ वर्षीय महिला गोविंदपूर ता.मुलचेरा यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोनारूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ६.४५ टक्के तर मृत्यूदर २.३९ टक्के झाला आहे.

(बॉक्स)

असे आहेत नवीन रुग्ण

नवीन १८० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४१, अहेरी १२, आरमोरी १४, भामरागड ८, चामोर्शी ३०, धानोरा तालुक्यातील ८, एटापल्ली ४, कोरची, कुरखेडा ७, मुलचेरा २१, सिरोंचा ३१ तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २६० रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७२, अहेरी १४, आरमोरी १४, भामरागड ४, चामोर्शी ५२, धानोरा १९, एटापल्ली ११, मुलचेरा १७, सिरोंचा १६, कोरची ७, कुरखेडा १४ तसेच देसाईगंज येथील २० जणांचा समावेश आहे.

Web Title: 180 new patients with 13 deaths