१७८ बंधाऱ्याचे काम अपूर्ण

By Admin | Updated: November 30, 2014 23:03 IST2014-11-30T23:03:32+5:302014-11-30T23:03:32+5:30

जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.

178 The work of the tomb is incomplete | १७८ बंधाऱ्याचे काम अपूर्ण

१७८ बंधाऱ्याचे काम अपूर्ण

सिंचनाची ऐशीतैशी : निधीअभावी ७ उपसा सिंचन योजना थंडबस्त्यात
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. सामान्य निधी अंतर्गत ९९ बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ६२ बंधारे पूर्ण झाले आहेत. तर या दोन्ही योजनेतील एकूण १७८ बंधारे अपूर्ण स्थितीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. निधी अभावी ७ उपसा सिंचन योजना थंडबस्त्यात आहे.
जि.प.च्या सिंचाई विभागामार्फत जिल्ह्यात दरवर्षी कोल्हापुरी पध्दतीचे तसेच साठवण बध्ाांरे, लघू पाटबंधारे तलाव, उपसा सिंचन योजना व माजी मालगुजारी तलावाचे काम करण्यात येते. लघू पाटबंधारे विभागामार्फत १९८९-९० पासून ते आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ५७७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून या बंधाऱ्यांच्या माध्यमातून ३०४६७.६० घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली असून प्रकल्पीय सिंचन क्षमता १३१८२.४१ हेक्टर क्षेत्रात निर्माण झाली असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ ल.पा. तलावाचे बांधकाम पूर्ण झाले असून या तलावांची साठवणूक क्षमता ०.८१५४४ दसलक्ष घनमिटर एवढी निर्माण झाली असून १४६०.०० हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षमता निर्माण झाली असल्याचे सिंचाई विभागाकडून सांगण्यात येत आहे. जि.प. सिंचाई विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या बंधारे, मामा तलाव व उपसा सिंचन योजनेची कामे ग्रामपंचायत प्रशासन, सुशिक्षीत बेरोजगार संघटना व कंत्राटदारांमार्फत केली जातात.
आदिवासी उपयोजनेंतर्गत बंधारे बांधकामासाठी जि.प. च्या लघू पाटबंधारे विभागाला सन २०११-१२ या वर्षात ३६०.६३ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. सदर निधी पूर्ण खर्च करण्यात आला. सन २०१२-१३ या वर्षात ४४१.६० लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ४२२.२२ लक्ष रूपये कामावर खर्च करण्यात आले. सन २०१३-१४ या वर्षात ४१३.२२ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ३१२.८३ रूपयाचा निधी खर्च झाला. सद्य:स्थितीत लघू पाटबंधारे विभागाकडे आदिवासी उपयोजनेंतर्गत ३४८.३२ लक्ष रूपयाचा निधी शिल्लक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मामा तलावाच्या लघू पाटबंधारे विभागाला २०११-१२ या वर्षात ४४.८३ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ३५.५३ लाखाचा निधी खर्च झाला. २०१२-१३ या वर्षात ५५.२० लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. तर ४०.२७ लक्ष रूपये खर्च झाले. मामा तलावाच्या योजनेंतर्गत लघू पाटबंधारे विभागाने ३७.३४ लक्ष रूपयाचा निधी खर्च केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 178 The work of the tomb is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.