१६९ कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या
By Admin | Updated: May 18, 2015 01:38 IST2015-05-18T01:38:04+5:302015-05-18T01:38:04+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ११ ते १५ मे २0१५ या कालावधीत पार पाडण्यात आली.

१६९ कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ११ ते १५ मे २0१५ या कालावधीत पार पाडण्यात आली. या बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील १६९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक बदल्या सामान्य प्रशासन, बांधकाम व आरोग्य विभागातील करण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागातील वर्ग तीन च्या २0 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, २२ कर्मचाऱ्यांच्या विनंती, दोन कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागातील वर्ग तीन च्या २३ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, पाच कर्मचाऱ्यांच्या विनंती आणि एका कर्मचाऱ्याची आपसी बदली करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या समायोजनाने करण्यात आल्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील वर्ग तीनच्या दोन कर्मचाऱ्यांची प्रशासकीय व विनंती बदली करण्यात आली.
शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व तीन कर्मचाऱ्यांच्या विनंती बदली करण्यात आली. कृषी विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व एका कर्मचाऱ्याची विनंती बदली, बांधकाम विभागाच्या १२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व दोन कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय पाच कर्मचाऱ्यांच्या विनंती आणि तीन कर्मचाऱ्यांच्या समायोजनाने बदल्या करण्यात आल्या. पंचायत विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, एका कर्मचाऱ्यांची विनंती आणि १६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाने बदल्या करण्यात आल्या. वित्त विभागाच्या वर्ग तिनच्या तीन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, सिंचाई विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या एका कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली.
जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, वित्त विभाग, सिंचाई विभागातील वर्ग चारच्या एकंदरीत ३२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. सर्व बदल्यांची प्रक्रिया कर्मचाऱ्यांची पूर्णपणे खातरजमा करून पारदर्शकरित्या पार पाडण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी ‘लोकमत’ला दिली. (स्थानिक प्रतिनिधी)