शहरात १.६७ कोटींची कामे मंजूर
By Admin | Updated: March 27, 2015 01:11 IST2015-03-27T01:11:28+5:302015-03-27T01:11:28+5:30
स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील तिनही प्रभागात दलित वस्ती योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षाकरिता १.६७ कोटी रूपयांची कामे मंजूर झाली ..

शहरात १.६७ कोटींची कामे मंजूर
गडचिरोली : स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील तिनही प्रभागात दलित वस्ती योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षाकरिता १.६७ कोटी रूपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती नगर सेवक भूपेश कुळमेथे यांनी दिली आहे.
मंजूर झालेल्या कामामध्ये रवींद्र मुनघाटे ते हंसराज रायपुरे यांच्या घरापर्यंत तसेच रघुनाथ धुर्वे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम दलित वस्ती योजनेंतून मंजूर करण्यात आली आहे. या कामाची किंमत ४ लाख ९७ हजार ४३७ रूपये आहे. भाष्कर बारसागडे ते सय्याम यांच्या घरापासून गभने यांच्या घरापर्यंत सिमेंट क्राँक्रिट नालीचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी ७ लाख ८१ हजार ३७० रूपये मंजूर करण्यात आले आहेत. जयलक्ष्मी लेडीज कार्नर ते सोनवाने यांच्या घरापर्यंत नाली बांधकामासाठी ४ लाख ९७ हजार ४३७ रूपये, राजू डोंगरे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामासाठी ५ लाख ४२ हजार ३२२ रूपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे. दलित वस्ती योजनेंतर्गत तिनही प्रभागात एकूण ९ कामे मंजूर करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतर या कामाची सुरूवात होणार आहे. दलित वस्ती योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे होणार असल्याने दलित वस्तींचा विकास होणार आहे. याशिवाय या वस्तीतील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा मिळणार आहेत, असे भूपेश कुळमेथे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)