जिल्ह्यात १,५५७ सिकलसेल रूग्ण
By Admin | Updated: December 10, 2014 22:57 IST2014-12-10T22:57:39+5:302014-12-10T22:57:39+5:30
जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, जिल्ह्याला अद्यापही सिकलसेलचा विळखा कायम असल्याचे स्पष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत एसएस पॅटर्नचे एकूण

जिल्ह्यात १,५५७ सिकलसेल रूग्ण
गडचिरोली : जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, जिल्ह्याला अद्यापही सिकलसेलचा विळखा कायम असल्याचे स्पष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत एसएस पॅटर्नचे एकूण १ हजार ५५७ सिकलसेल पीडित रूग्ण आहेत. तर एएस पॅटर्नचे १६ हजार ६४५ रूग्ण आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने गडचिरोली तालुक्यातील एकूण १ लाख ४३ हजार २१८ लोकसंख्येपैकी १२ लाख १ हजार ३०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ३२९ व एएस पॅटर्नचे ३ हजार १६१ सिकलसेल रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात एकूण १ लाख ८ हजार ३४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १४४ व एएस पॅटर्नचे १ हजार ५५८ सिकलसेल वाहक रूग्ण आढळून आले. देसाईगंज तालुक्यात १ लाख ८ हजार ८९८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ७६ व एएस पॅटर्नचे ८८६ रूग्ण आढळून आले. कुरखेडा तालुक्यात १ लाख ११ हजार २६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे २३६ पीडित रूग्ण आढळून आले. तर एएस पॅटर्नचे २ हजार ३४० वाहक रूग्ण आढळून आले. कोरची तालुक्यात १ लाख ९ हजार ४४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ४९ व एएस पॅटर्नचे ९१५ सिकलसेल रूग्ण आढळून आले.
धानोरा तालुक्यात १ लाख १० हजार ८५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १२३ व एएस पॅटर्नचे ८७० रूग्ण आढळून आले. चामोर्शी तालुक्यात १ लाख १३ हजार २०५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये एसएस पॅटर्नचे २१७ तर एएस पॅटर्नचे २ हजार ८८३ रूग्ण आढळून आले. मुलचेरा तालुक्यात १ लाख ६ हजार ७९९ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ३० व एएस पॅटर्नचे २२१ सिकलसेल रूग्ण आढळून आले. अहेरी तालुक्यात १ लाख १३ हजार ५६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १८१ पीडित सिकलसेल रूग्ण आढळून आले.
तर एएस पॅटर्नचे १ हजार ७१० वाहक रूग्ण आढळून आले. एटापल्ली तालुक्यात एकूण १ लाख ११ हजार ३२७ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ५८ व एएस पॅटर्नचे ५६३ रूग्ण आढळून आले. भामरागड तालुक्यात १ लाख ४ हजार २०५ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे २७ व एएस पॅटर्नचे ४२६ रूग्ण आढळून आले. सिरोंचा तालुक्यात एकूण १ लाख ५ हजार ८२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ८२ व एएस पॅटर्नचे १ हजार ११२ रूग्ण आढळून आले.
(स्थानिक प्रतिनिधी)