शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

१५ हजार क्विंटल धान उघड्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. यापैैकी ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित धान गोदाम परिसरातील पटांगणात ताडपत्री झाकून ठेवले आहे.

ठळक मुद्देमार्र्कंडा कंसोबा येथील केंद्र : अतिरिक्त गोदामाअभावी पावसाळ्यात नुकसानाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी करण्यात आली. यापैैकी केवळ ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित १५ हजार क्विंटल १७८ किलो धान गोदामालगतच्या परिसरात ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने अतिवृष्टीत धान भिजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. यापैैकी ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित धान गोदाम परिसरातील पटांगणात ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने झाकून ठेवलेले धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी महामंडळाच्या वतीने धानाची खरेदी केली जाते. परंतु योग्यवेळी धानाची उचल होत नाही. मार्र्कंडा कंसोबा येथे खरेदी केलेल्या धानापैैकी पाऊण टक्के धानाची उचल झाली नाही. गोदामामध्ये धान ठेवण्यासाठी जागा नसल्याने धानाचे कट्टे बाहेर मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवले आहेत. आधारभूत भावांतर्गत १ हजार ८१५ व १ हजार ८३५ रूपये प्रति क्विंटल दराने जाड व बारीक धानाची खरेदी करण्यात आली. यावर ७०० रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होती. लॉकडाऊनच्या कालावधीत काही दिवस धान खरेदी बंद झाली होती. मात्र मुदतवाढीनंतर पुन्हा धान खरेदी सुरू झाली. परंतु खरेदी केलेल्या धानाची उचल अद्यापही केली नाही.सर्वत्र एकसारखी स्थितीचामोर्शी तालुका लोकसंख्या व आकारमानाच्या दृष्टीने जिल्ह्यात मोठा आहे. त्या मानाने तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनचे खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांद्वारे खरेदी केलेले धान गोदामाअभावी मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती