१५ दारूविक्रेत्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:23+5:302021-05-09T04:38:23+5:30
कुरखेडा पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई १५ दारूविक्रेत्यांविरोधात ...

१५ दारूविक्रेत्यांवर धाड
कुरखेडा पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई १५ दारूविक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व मोहफुलांची दारू जप्त करण्यात आली.
कुरखेडा
पोलिसांनी बुधवार, गुरूवार व शुक्रवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुरखेडा, मोहगाव, शिरपूर, गुरनोली, तळेगाव, देऊळगाव, मालदुगी, गोठणगाव, वडेगाव, आंधळी, वासीटोला व शिवटोला येथील १५ दारूविक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी विरोधी कायद्यान्वये गून्हा दाखल केला. त्यांच्याकडून ५७ हजार ९०० रूपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. सदर मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांचा मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार बाबूराव उराडे, गौरीशंकर भैसारे, मधूकर बारसागडे, खूशाल वालदे भगवान तलांडे, गोंडाणे, कन्नाके, केवळराम धांडे, मनोहर पुराम, ललित जांभूळकर, नितीन नैताम, नेपाल मडावी, भोजराज शिंदे, रूपेश काळबांधे, योगेश काळेवार यांनी केली.