अहेरी उपविभागात १५ उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: February 5, 2017 01:33 IST2017-02-05T01:33:33+5:302017-02-05T01:33:33+5:30
अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जि.प., पं.स. निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला वेग आला आहे.

अहेरी उपविभागात १५ उमेदवारी अर्ज दाखल
जिल्हा परिषदेसाठी सात अर्ज आलेत : सर्वाधिक अर्ज सिरोंच्यात
गडचिरोली : अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जि.प., पं.स. निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला वेग आला आहे. शनिवारपर्यंत अहेरी येथे सहा तर सिरोंचा येथे आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. भामरागड येथे एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. तर एटापल्ली येथे एका उमेदवाराचा अर्ज पं.स. करिता दाखल झाला आहे.
सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ गणासाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदसाठी चार तर पंचायत समितीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
झिंगानूर-आसरअल्ली जिल्हा परिषद गणात तैनेनी सरीता रमेश यांनी अपक्ष म्हणून शनिवारी अर्ज दाखल केला. तर विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद जि.प. गणातून वरसे वैशाली जोगा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. नारायणपूर-जानमपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातून जनगाम जयसुधा बानय्या यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा जि.प. मतदार संघातून जेट्टी शारदा मलय्या यांनीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पंचायत समितीच्या जाफ्राबाद गणातून पिडगू कविता सत्यम यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यांच्याशिवाय पेद्दी सरीता सुधाकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नारायणपूर पं.स. गणातून झोडे शकुंतला सखाराम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विठ्ठलरावपेठा पं.स. गणातून वेलादी बानक्का शंकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज म्हणून दाखल केला आहे.
एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी पं.स. गणातून भाराकाँतर्फे शालिक गणुजी गेडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केला.
भामरागड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणासाठी शनिवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)