तेलंगणातून आलेली दीड लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:13+5:302021-07-17T04:28:13+5:30
येल्लामाल येथे अवैध दारूविक्री पूर्णतः बंद होती. जुने विक्रेते कारवाईच्या भीतीने अवैध व्यवसायातून बाहेर पडले होते. मात्र, गावातील काही ...

तेलंगणातून आलेली दीड लाखाची दारू जप्त
येल्लामाल येथे अवैध दारूविक्री पूर्णतः बंद होती. जुने विक्रेते कारवाईच्या भीतीने अवैध व्यवसायातून बाहेर पडले होते. मात्र, गावातील काही युवकांनी पैशाच्या लालसेपोटी अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. तेलंगणा राज्यातून डोंग्याने गावात दारू आणून विक्री करण्याचा सपाटा त्यांनी लावला. गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणली असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यानुसार अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले व विक्रेत्यांच्या घराची तपासणी केली असता जवळपास १ लाख ५२ हजारांची विविध कंपन्यांची विदेशी दारू मिळून आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दारूविक्रेते अल्प वयाचे असून त्यांच्यावर कारवाई करू नका, पुन्हा ते दारू विक्री करणार नाही, असा विश्वास देत गावकऱ्यांनी जबाबदारी घेतली. त्यामुळे गावकऱ्यांच्या उपस्थितीत विक्रेत्यांच्याच हातांनी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला.