लाचखोर डॉक्टरला १५ दिवसांची कोठडी
By Admin | Updated: November 28, 2015 02:32 IST2015-11-28T02:32:56+5:302015-11-28T02:32:56+5:30
कर्मचाऱ्यांच्या निर्वाहभत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करून सदर बिल सिरोंचा पंचायत समितीकडे सादर करण्याच्या ...

लाचखोर डॉक्टरला १५ दिवसांची कोठडी
गडचिरोली : कर्मचाऱ्यांच्या निर्वाहभत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करून सदर बिल सिरोंचा पंचायत समितीकडे सादर करण्याच्या कामासाठी नऊ हजार रूपयांची लाच घेताना सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकदेव माधवराव करेवाड याला गडचिरोलीच्या एसीबी पथकाने रंगेहाथ अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने डॉ. करेवार याला ११ डिसेंबरपर्यंत १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डॉ. सुकदेव करेवाड याला एसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर गुरूवारी गडचिरोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आल्याने न्यायालयाने डॉ. करेवाड याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी पुन्हा गडचिरोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती एसीबीचे पोलीस निरिक्षक दामदेव मंडलवार यांनी दिली आहे.