१५ हृदयरोगी शस्त्रक्रियेसाठी सावंगीकडे रवाना

By Admin | Updated: November 17, 2016 02:09 IST2016-11-17T02:09:27+5:302016-11-17T02:09:27+5:30

राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी

15 Cardiac Surgery for Cardiology | १५ हृदयरोगी शस्त्रक्रियेसाठी सावंगीकडे रवाना

१५ हृदयरोगी शस्त्रक्रियेसाठी सावंगीकडे रवाना

पालकमंत्र्यांचा पुढाकार : लहान बालके व नागरिकांना मिळणार नवसंजीवनी
अहेरी : राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागाच्या विविध गावातील गरीब कुटुंबातील हृदयरोगाने ग्रस्त लहान बालके व इतर नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी वर्धानजीकच्या सावंगी मेघे येथील आचार्य व विनोबा भावे रूग्णालयात वाहनाने रवाना करण्यात आले.
स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज प्रतिष्ठाण अहेरी व आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबर रोजी अहेरी येथे हृदयरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी अहेरी उपविभागातील अनेक गावातील लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर बुधवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सर्व हृदय रूग्णांना विविध तपासणी व शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. दरम्यान पालकमंत्री आत्राम यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर रूग्णांची आस्थेने विचारपूस केली. सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या प्रसंगी भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, रणजित रामटेके हे रूग्णांसोबत सावंगी रवाना झाले. सर्व हृदय रूग्णांना पाठविण्याची व्यवस्था पालकमंत्र्यांनी केली असून शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, भोजन व्यवस्थाही पालकमंत्री आत्राम करणार आहेत. यावेळी डॉ. पोतदार, अहेरीचे डॉ. शेंडे, गिरीष मद्देर्लावार, नासिर सय्यद, सुरज ओल्लालवार, दिवसे, संतोष मेडिवार उपस्थित होते.

Web Title: 15 Cardiac Surgery for Cardiology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.