गडचिरोली विभागातील १४८ बसेस ‘कोरोना फ्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST2021-09-19T04:38:02+5:302021-09-19T04:38:02+5:30
एसटीच्या गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी या तीन आगारांतील मिळून १५९ बसगाड्यांवर अँटी मायक्रोबियल कोटिंगची प्रक्रिया करण्याचे ...

गडचिरोली विभागातील १४८ बसेस ‘कोरोना फ्री’
एसटीच्या गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी या तीन आगारांतील मिळून १५९ बसगाड्यांवर अँटी मायक्रोबियल कोटिंगची प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४८ बसेसमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ ११ बसेस बाकी आहे.
(बॉक्स)
प्रत्येक बसला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग
बसगाड्यांना विषाणूमुक्त ठेवण्यासाठी केल्या जाणारे कोटिंग दोन महिनेपर्यंत प्रभावी राहते. त्यामुळे दर दोन महिन्यांनी म्हणजे वर्षातून चारवेळा ही कोटिंग प्रक्रिया केली जाणार आहे. याचा अर्थ पुढील वर्षभर या गाड्या कोरोनामुक्त राहणार आहेत.
(बॉक्स)
बसचा स्पर्श बिनधास्त, पण प्रवाशांपासून राहा सावध
बसेस आता विषाणूमुक्त असल्यामुळे बसला कुठेही स्पर्श केला तरी कोरोनाची बाधा होणार नाही. कारण कोटिंगमुळे कोरोनाचे विषाणू त्यावर टिकणार नाही. मात्र प्रवासात शेजारी बसणारा प्रवासी जर कोरोनाबाधित असेल तर त्याच्या नाका-तोंडावाटे निघणारे विषाणू थेट तुमच्या अंगावर पडल्यास बांधा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावूनच प्रवास करणे गरजेचे आहे.
(कोट)
राज्यस्तरीय कंत्राटानुसार गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या तीनही आगारातील १५९ बसेसची या कोटिंगसाठी निवड केली होती. उर्वरित बसेस पूर्वीप्रमाणे धुवून सॅनिटाइझ करून वापरल्या जात आहेत. पण सर्व प्रवाशांनी मास्क वापरणे आवश्यक आहे.
- संजय सुर्वे
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
(बॉक्स)
किती बसेसना कोटिंग?
गडचिरोली - ५४ , ५४
अहेरी - ४३ , ४३
ब्रह्मपुरी - ६२ , ५१