शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 18:10 IST

बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाईमुळे काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बसस्थानक परिसरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जाेपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांवर पहिली कारवाई करताना संपात सहभागी १४ कर्मचाऱ्यांना विभागीय वाहतूक अधीक्षकांनी निलंबित केले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अनुचित घटना टाळण्यासाठी पाेलीस बंदाेबस्त

निलंबनाची कारवाई केल्यानंतर काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी एसटी विभागाने पाेलीस बंदाेबस्त मागविला हाेता. दिवसभर बसस्थानक परिसरात पाेलिसांचा पहारा हाेता. मात्र, निलंबनाची यादी बसस्थानकावर चिकटविल्यानंतरही संप शांततेत सुरू हाेता. काेणतीही अनुचित घटना घडली नाही.

बडतर्फ केले तरी संप सुरूच राहणार

संपात सहभागी झाल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार, याची खात्री पूर्वीच हाेती. मात्र, या कारवाईला न घाबरता संप सुरू ठेवला आहे. निलंबनच नाही तर सेवेतून बडतर्फ केले तरी आंदाेलन मागे घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदाेलक कर्मचाऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली आहे.

आगारनिहाय निलंबित कर्मचारी

गडचिराेली - ३

अहेरी - ६

ब्रह्मपुरी - ५

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबनagitationआंदोलनPublic Transportसार्वजनिक वाहतूक