१४ सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार
By Admin | Updated: October 4, 2015 02:07 IST2015-10-04T02:07:27+5:302015-10-04T02:07:27+5:30
गेल्या वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या १४ मुख्याध्यापकांचा जाहीर सत्कार...

१४ सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार
विविध विषयांवर चर्चा : मुख्याध्यापक असोसिएशनचे आयोजन
गडचिरोली : गेल्या वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या १४ मुख्याध्यापकांचा जाहीर सत्कार गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने गुरूवारी गडचिरोली येथे एकाच मंचावर शिवाजी हायस्कूल गोकुलनगर गडचिरोली येथे करण्यात आला.
या अभिनव कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, उप शिक्षणाधिकारी निकम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय नार्लावार, माजी अध्यक्ष जयंत येलमुले, सचिव तेजराम बोरकर, उपाध्यक्ष सी. एल. डोंगरवार, महेश तुमपल्लीवार, खजिनदार, संजय भांडारकर, संयुक्त सचिव वाठे, प्रल्हाद मंडल, मुकूंद म्हशाखेत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात आर. टी. पिल्लारे वडसा, एस. एस. गजभिये सोनापूर, एम. एन. खुणे कुरखेडा, व्ही. एस. टेंभुर्णे येंगलखेडा, नंदकिशोर मंगाम व्यंकटरावपेठा, व्ही. के. शिंदे अडपल्ली, जे. एस. म्हस्के पोर्ला, व्ही. ए. गुरूनुले विहिरगाव, सी. खोब्रागडे अंकिसा, पी. एम. हेमके आरमोरी, एम. एस. वंजारी देऊळगाव, पी. ए. थोटे वासाळा, व्ही. पी. कावडे जामगिरी, एस. डी. तोटावार आलापल्ली यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना शिक्षणाधिकारी आत्राम यांनी सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापकांनी समाजसेवेचे काम तत्परतेने करावे, असे आवाहन केले. मनिष शेटे यांनी संचालन तर आभार सी. एल. डोंगरवार यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून २०० मुख्याध्यापक उपस्थित होते.