१४ लाखांच्या दारूचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:41 IST2021-05-25T04:41:17+5:302021-05-25T04:41:17+5:30

देसाईगंज : देसाईगंज पाेलिसांनी दारू तस्करी प्रकरणी ६४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्यांवर राेड राेलर ...

14 lakh worth of liquor crushed | १४ लाखांच्या दारूचा चुराडा

१४ लाखांच्या दारूचा चुराडा

देसाईगंज : देसाईगंज पाेलिसांनी दारू तस्करी प्रकरणी ६४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्यांवर राेड राेलर फिरवून त्यातील दारूसह त्या नष्ट केल्या. या कारवाईत तब्बल १४ लाखांच्या दारूचा चुराडा झाला.

येथील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूला असलेल्या मैदानावर कुरखेडाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत आणि देसाईगंजचे पाेलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल यांच्या समक्ष ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, दारू विक्रेत्यांविरूद्धच्या देसाईगंज पाेलिसांच्या कारवाया सुरूच आहेत. लाॅकडाऊनच्या काळातही अनेक लाेक छाेट्या स्वरूपात देशी दारू विक्रीवर भर देत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. देशी दारू विक्री करणाऱ्या कुरूड आणि आंबेडकर वाॅर्डातील आराेपींवर गुन्हा दाखल करून ९० मिली मापाच्या २० नग बाटल्या जप्त करण्यात आल्या. यातील तुळशीराम सीताराम ठाकरे (रा. कुरूड) याला अटक केली असून तुफानसिंग राजुसिंग पटवा (रा. आंबेडकर वाॅर्ड) हा पळून जाण्यात यशस्वी झाला.

दुसऱ्या कारवाईत उसेगाव येेथील ग्यानिवंत आत्माराव गावतुरे या आराेपीकडून देशी दारूच्या ९० मिली मापाच्या ८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत आंबेडकर वाॅर्डातील काेमल ज्ञानदेेव माेटघरे या आराेपीकडून १० लीटर हातभट्टीची माेहा दारू जप्त केली. याशिवाय आंबेडकर वाॅर्डातील विजय वसंता पानसे याच्याकडून देशी दारूच्या ९० मिली मापाच्या २८० नग बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आली. आराेपी नागेश श्रीराम गाेट्टीप्रतीवार रा. माहुरकुडा, ता.अर्जुनी (जि.गाेंदिया) आणि धर्मकुमार कुदरूपाका रा.अर्जुनी (जि.गाेंदिया) हे दाेन आराेपी फरार आहेत.

Web Title: 14 lakh worth of liquor crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.