दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:33+5:30

पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त करून तब्बल ५ हजाराचा मुद्देमाल व साहित्य नष्ट केले.

14 handcuffs of alcohol destroyed | दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त

दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त

ठळक मुद्देलॉकडाऊनचे उल्लंघन : मोहफुल सडव्यासह ७० हजारांचा मुद्देमाल नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : विदेशी दारूची आवक बंद झाल्यामुळे सध्या सिरोंचा तालुक्यात गावठी मोफुलाची दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरून लपून दारू गाळणाऱ्या चार गावातील तब्बल १४ हातभट्ट्यांवर पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून मुक्तिपथ गाव संघटना व तालुका चमूने तब्बल ७० हजाराचा मुद्देमाल व गावठी दारू शुक्रवारी जप्त केली.
कोरोंना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्याला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेथून कुणीही तालुक्यात दाखल होऊ नये यासाठी सिरोंचा पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्याचबरोबर लोकांनी लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही केले जात आहे. परिणामी तेलंगणा राज्यातून होणारी विदेशी दारूची तस्करी कमी झाली आहे.
पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त करून तब्बल ५ हजाराचा मुद्देमाल व साहित्य नष्ट केले. सूर्यरावपल्ली या गावात तब्बल ६ ठिकाणी धाड टाकून ८ ड्रम गुळाचा सडवा व इतर साहित्य असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल नष्ट केले. पाच जणांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मद्दीकुंटा या गावी ६ ठिकाणी धाड टाकून पोलीस व मुक्तिपथ चमूने १५ लीटर दारू जप्त केली. तिघांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जानमपल्ली येथे एका घरी धाड टाकून जमिनीत गाडलेला चार ड्रम गुळसडवा नष्ट केला. तब्बल २० हजाराचा मुद्देमाल यावेळी सापडला.
दारू गाळण्यासाठी लागणारा गुळही महागला असल्याने गाळली जाणारी दारूही जास्त दराने विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन पाळून अवैध धंदे बंद करण्याची तंबी यावेळी पोलिसांनी दारू गाळणाऱ्यांना दिली. पोलीस निरीक्षक अजय अहीरकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे, शीतल दविली आणि सेलोकर यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाया करण्यात आल्या.

Web Title: 14 handcuffs of alcohol destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.