१३३२ महिलांना लाभ

By Admin | Updated: November 29, 2014 23:19 IST2014-11-29T23:19:52+5:302014-11-29T23:19:52+5:30

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ या सात महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने

1332 Benefits to women | १३३२ महिलांना लाभ

१३३२ महिलांना लाभ

संस्थात्मक प्रसूती : जननी सुरक्षा योजना
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ या सात महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने संस्थात्मक प्रसूती झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील १ हजार ३३२ महिलांना लाभ देण्यात आला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातेची प्रसुती दवाखान्यात झाल्यास ७०० रूपये व घरी पसुती झाल्यास ५०० रूपयाचा आर्थिक लाभ महिलांना दिला जातो. काही जोखीम निर्माण झाल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागल्यास तसेच शासकीय रूग्णालयात डॉक्टरांची सेवा उपलब्ध नसल्यास खासगी मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून उपचार घेता येते. डॉक्टरांचे मानधन म्हणून १ हजार ५०० रूपये रक्कमेचा लाभ संबंधीत महिलांना दिला जातो. सदर योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील महिलांना दिला जातो.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बाराही तालुक्यात एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ दरम्यान विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १ हजार ४२७ गरोदर महिलांनी नोंदणी केली. यापैकी ४७० गरोदर महिलांना आशामार्फत आणण्यात आले. तर ९५७ गरोदर महिलांना ए.एन.एम. मार्फत आणण्यात आले. १४२७ गरोदर महिलांपैकी १ हजार ३३२ महिलांची संस्थेत प्रसुती झाली. तर एका महिलेचे घरी प्रसुती झाली. या महिलेला ६०० रूपयाचा लाभ देण्यात आला.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयात प्रसूत झालेल्या महिलांना दिला जातो. गरोदर मातेची प्रसुती दवाखान्यातच व्हावी, जेणेकरून आरोग्याच्यादृष्टीने सोयीस्कर होईल, असे आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येते. मात्र दुर्गम भागात वाहतुकीच्या सोयीसुविधा नसल्यामुळे अनेक गरोदर मातांची प्रसुती घरीच होते. अशावेळी नवजात बालक तसेच मातेला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे दवाखान्यामध्येच प्रसुती होणे आरोग्याच्या दृष्टीकोणातून चांगले आहे. याकरीताच शासनाने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. यामध्ये रूग्णांना वाहतूक खर्च, मोफत औषधोपचार दिला जातो.

Web Title: 1332 Benefits to women